आचारसंहितेच्या काळातही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार! महिला व बाल विकास विभागाने दिली मोठी माहिती.Ladki Bahin Yojana Update

आचारसंहितेच्या काळातही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार! महिला व बाल विकास विभागाने दिली मोठी माहिती.Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: नमस्कार मित्रानो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक सरकारी योजनांवर तात्पुरता ब्रेक लागणार का, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये थोडीशी चिंता दिसत आहे.

आचारसंहिता लागल्याने योजना बंद होणार का? Ladki Bahin Yojana Update

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकार किंवा मंत्री नवीन योजना जाहीर करू शकत नाहीत, अनुदान वाटप करू शकत नाहीत किंवा नवीन प्रकल्पांना मंजुरी देऊ शकत नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजना थांबेल का अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती.

परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे. कारण महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवर कोणताही परिणाम होणार नाही.

विद्यमान लाभार्थ्यांना हप्ता मिळतच राहणार. Ladki Bahin Yojana Update

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही योजना आधीपासूनच सुरू आहे आणि सर्व लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन लाभार्थींची नोंदणी सध्या बंद असली तरी, आधीपासून पात्र ठरलेल्या महिलांना त्यांचा मासिक हप्ता नियमित मिळणार आहे.

म्हणजेच, आचारसंहितेच्या काळातही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरूच राहील, असा विभागाचा दावा आहे.

केवायसी (KYC) प्रक्रिया अनिवार्य

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने आता KYC प्रक्रिया बंधनकारक केली आहे. लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
जर लाभार्थ्यांनी वेळेत KYC केली, तर त्यांना हप्ता नियमितपणे मिळत राहील. परंतु अंतिम मुदत संपल्यानंतर KYC न केलेल्या लाभार्थ्यांचे नाव योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे.

केवायसीची मुदत वाढणार का? Ladki Bahin Yojana Update

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गरज भासल्यास सरकार महिलांना KYC साठी मुदतवाढ देण्याचा विचार करू शकते.”
यामुळे आता खरोखरच सरकारकडून मुदतवाढ जाहीर होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाचे मुद्दे एक नजरात. Ladki Bahin Yojana Update.
  1. आचारसंहिता लागू असूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबणार नाही.
  2. आधीपासून मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना हप्ता मिळत राहणार.
  3. 18 नोव्हेंबरपर्यंत KYC पूर्ण करणे अनिवार्य.
  4. मुदतवाढीबाबत निर्णय लवकरच होण्याची शक्यता.

Leave a Comment